
माहुर प्रतिनिधी
देवींच्या साडेतीन शक्तीपीठापैकी मूळ शक्तीपीठ असलेल्या माहूर गडावर दरवर्षीप्रमाणे आश्विन शुद्ध प्रतिपदा दि 11ऑक्टोबर 2026 रोजी धर्मादाय आयुक्त तथा संस्थानच्या अध्यक्षा हिराबाई शेळके यांच्या उपस्थितीत मंगल वाद्यांच्या गजरात वेदमंत्राच्या घोषात हजारो भाविकाच्या उपस्थितीत घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवास विधिवत प्रारंभ करण्यात आला.यावेळी मुख्य गाभाऱ्यात विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी,संजय कान्नव, अरविंद देव,विनायक फांदाडे, दुर्गादास भोपी, बालाजी जगत,आशिष जोशी,पुजारी भवाणीदास भोपी, शुभम भोपी,तहसीलदार तथा कोषाध्यक्ष अभिजित जगताप उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांची उपस्थिती होती.गडावरील मंदिरात मंगल वाद्यांच्या निनादात विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी,भवाणीदास भोपी यांच्या हस्ते श्री रेणुका मातेला पंचामृत अभिषेक, शेंदुर लेपण,मळवट भरून पैठणी महावस्त्र पारंपरिक अलंकार अर्पण करून खणा नारळाची ओटी अर्पण केल्यानंतर पुरणपोळीचा महानैवेद्य महाआरती करण्यात आली.त्यानंतर परिसर देवता पुजन छबीणा काढण्यात आला.

तसेच संस्थानच्या अध्यक्षा हिराबाई शेळके यांच्या हस्ते कुमारीका पुजन करण्यात आले. गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी संस्थांतर्फे सुलभ दर्शन रांग, पिण्याचे पाणी,परी्शुराम मंदीर परिसरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच उपवास असलेल्या भाविकांसाठी साबुदाणा खिचडी,नायलोन चिवडा व फळांची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी सुरक्षा कर्मचारी,अखंडीत विज पुरवठा इत्यादी सोई सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत व्यवस्थापक विजय राऊत सुरक्षा अधिकारी महादेव मुंडे हे मंदिर परिसरात भाविकांना कुठलीच अडचण होऊ नये म्हणून सतत कार्यरत होते यावेळी आ धनंजय मुंडे तसेच आ संतोष बांगर यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन देशात सुख शांतता समृद्धीं नांदु दे अशी प्रार्थना केली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी माहूर शहरा सह गडावर केलेल्या फीक्स पॉईंटवर भाविकांना कुठलीच अडचण येऊ नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवत स्वतः बारीक लक्ष ठेवून होते या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य वेळ.द.शा.संपन्न रविंद्र कान्नव वे मू निलेश केदार गुरुजी यांनी केले तर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मार्तंड कुलकर्णी यांनी केले यावेळी पुजारी वल्लभ आमले सागर देव,अनिल कान्नव, मंगेश कान्नव,मंगेश रीठे. विजय कोरटकर, श्रीपाद जगत, गणेश जगत,गणेश संतान सागर कान्नव यांचेसह ब्रम्हवृंद पुजारी उपस्थित होते.













Leave a Reply