सत्यशोधक Live न्यूज

माहिती ,सत्य,बातमीदारी

माहुर तालुक्यातील वाई बाजार येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू; वनविभागाकडून घटनास्थळाचा पंचनामा.

माहुर प्रतिनिधी : रुपेश मोरे

माहुर तालुक्यात वन्यजीवांचा वावर दिवसेंदिवस वाढ चालला असून, आता बिबट्याने थेट पाळीव प्राण्यांना लक्ष्य केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र दहशत पसरली आहे. तालुक्यातील वाई बाजार येथील शेतकरी शंकर सोनुले यांच्या शेतात (सर्वे नंबर १७) बिबट्याने एका लहान वासराची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वाई बाजार शिवारातील सर्वे नंबर १७ मधील शेतकरी शंकर सोनुले यांच्या शेतात जनावरे बांधलेली होती. दरम्यान, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक गोठ्याकडे धाव घेत वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला. सकाळी शेतकरी वस्तीवर गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला, ज्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.माहुर परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्या आणि इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता थेट पाळीव जनावरांवर हल्ले सुरू झाल्यामुळे शेतकरी व शेतमजूर धास्तावले आहेत. रात्रीच्या वेळी सोडाच, पण दिवसाढवळ्याही शेतात काम कसे करायचे, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला असून महिला व शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आली साहेब आणि वनरक्षक (वाई) ज्ञानेश्वर माळेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा पूर्ण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *