सत्यशोधक Live न्यूज

माहिती ,सत्य,बातमीदारी

माहूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी AgriStack अभियानांतर्गत ‘फार्मर आयडी’साठी चारही महसूल मंडळात विशेष शिबिरांचे आयोजन.

माहुर प्रतिनिधी :

केंद्र सरकारच्या ‘डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एग्रीकल्चर’ (Digital Public Infrastructure for Agriculture) या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपला शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार केला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालय माहूर यांच्या वतीने बुधवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी तालुक्यातील चारही महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

AgriStack अभियानांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा Farmer ID तयार करणे बंधनकारक आणि अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या अनुषंगाने पात्र शेतकऱ्यांकडे Farmer ID उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून शासनाच्या योजनांचा लाभ सहज मिळू शकेल.

दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी माहूर तालुक्यातील खालील चारही महसूल मंडळामध्ये ही शिबिरे पार पडणार आहेत:

⚫माहूर – दिनांक ०४/११/२०२६

⚫वाई (बा.) -दिनांक ०४/११/२०२६

⚫सिंदखेड – दिनांक ०४/११/२०२६

⚫वानोळा – दिनांक ०४/११/२०२६

सदर शिबिरांमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे Farmer ID नाही, अशा शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि सेतू चालक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल.माहूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप Farmer ID काढलेला नाही, त्यांनी आपल्या संबंधित महसूल मंडळातील शिबिरात आवर्जून उपस्थित राहावे.नोंदणीसाठी सोबत आधार कार्ड आणि आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक घेऊन जाणे अनिवार्य आहे.ज्या शेतकऱ्यांना शिबिरात जाणे शक्य नाही, ते घरबसल्या स्वतःच्या माध्यमातून देखील अधिकृत संकेतस्थळ http://mhfr.agristack.gov.in/ वर जाऊन आपली नोंदणी करू शकतात.

माहूर तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन तातडीने आपला Farmer ID तयार करून घ्यावे, असे आवाहन तहसील कार्यालय माहूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *