सत्यशोधक Live न्यूज

माहिती ,सत्य,बातमीदारी

सारखणी येथे धान्याचा काळा बाजार तेजीत! ‘ट्रेडिंग’च्या भुसार धान्याच्या नावाखाली रेशनच्या तांदूळ आणि गव्हाची थेट तस्करी.

​सारखणी (प्रतिनिधी):

गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी शासनाकडून सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या रेशन धान्याचा सारखणी शहरात सर्रास काळा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सारखणी येथील ट्रेडिंग च्या दुकानात भुसार धान्याच्या खरेदी-विक्रीच्या नावाखाली शासकीय रेशनच्या गव्हाची आणि तांदळाची सर्रास तस्करी केली जात असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे.​शासकीय धान्याची उघड्यावर लुटसारखणी परिसरातील रेशन दुकानांमधून गोरगरिबांच्या हक्काचे मिळणारे धान्य तुटपुंज्या दराने विकत घेऊन अथवा रेशन माफियांशी हातमिळवणी करून हे धान्य ‘ट्रेडिंग’ मध्ये जमा केले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

भुसार मालाचा व्यापार करत असल्याचे भासवून रात्रीच्या अंधारात किंवा बनावट पावती पुस्तकांच्या जोरावर रेशनचा तांदूळ आणि गहू मोठ्या व्यापाऱ्यांना चढ्या भावाने विकला जात असल्याची मोठी साखळी यामागे कार्यरत आहे.​सर्वसामान्य जनतेच्या ताटातील अन्न हिसकावून स्वतःचे खिसे भरणारे हे रेशन माफिया प्रशासनाच्या नाकाखाली हा सगळा काळा बाजार चालवत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर धान्याची हेराफेरी होत असताना संबंधित पुरवठा विभाग आणि महसूल प्रशासन झोपले आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ धाड टाकल्यास रेशन तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.​कडक कारवाईची मागणीगोरगरिबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या ‘ट्रेडिंग’च्या या संशयास्पद कारभाराची सखोल चौकशी करून संबंधित मालकावर तडीपारीसह गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि दुकानावर सील ठोकण्यात यावे, अशी जोरदार मागणी सारखणी येथील स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.​

आता या तस्करावर प्रशासन काय पाऊल उचलते, की रेशन माफियांचे हे साम्राज्य असेच सुरू राहणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *