खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची दखल; महसूल विभागाची प्रत्यक्ष कार्यवाही.
माहूर प्रतिनिधी – रुपेश मोरे
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या Farmer ID आणि AgriStack नोंदणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवासेना तालुका संघटक गोपाल नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. वानोळा सजा व परिसरातील महसुली सज्जांमध्ये गुरुवारी महसूल विभागाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली. निवासी नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या नोंदणीसंदर्भातील कामकाज करण्यात आले.
माहूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना Farmer ID व AgriStack नोंदणीअभावी पीककर्ज आणि विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळविताना अडचणी येत होत्या. ही बाब गोपाल नाईक यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर खासदार आष्टीकर यांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना लेखी पत्राद्वारे निर्देश देऊन गावनिहाय विशेष शिबिरे आयोजित करण्याची आणि प्रलंबित नोंदणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
या पाठपुराव्यानंतर महसूल विभागाने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनापासून लोकप्रतिनिधींपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या गोपाल नाईक यांच्या भूमिकेची परिसरात चर्चा होत असून, विविध स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्नांवरील सक्रियता चर्चेत.
आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपाल नाईक यांचे शेतकरी प्रश्नांवरील काम लक्ष वेधून घेत आहे. स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यावर पाठपुरावा करणे आणि प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी प्रयत्न करणे, या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या आहेत. Farmer ID च्या प्रश्नावर झालेली कार्यवाही हा त्याच पाठपुराव्याचा एक भाग ठरला आहे.शेतकऱ्यांची प्रलंबित नोंदणी पूर्ण होऊन पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, हीच या प्रयत्नांमागील भूमिका आहे. आता उर्वरित प्रकरणे किती लवकर मार्गी लागतात, याकडे माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.













Leave a Reply