सत्यशोधक Live न्यूज

माहिती ,सत्य,बातमीदारी

शब्दांपेक्षा कृतीतून सामाजिक बांधिलकी; पिंटू पाटील व गोपाल नाईक यांचा पुढाकार कौतुकास्पद.

माहुर प्रतिनिधी : रुपेश मोरे

माहूर : गंगाजी नगर येथे काल पार पडलेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी महाआरोग्य शिबिरानंतर आज प्रत्यक्ष शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

केवळ शिबिर आयोजित करून न थांबता रुग्णांच्या उपचारांची पुढील जबाबदारीही स्वीकारण्याचा पुढाकार पिंटू उर्फ लक्ष्मीकांत आशीर्वाद कदम पाटील यांनी घेतला आहे.नामदार श्री. हेमंतभाऊ पाटील व राजश्रीताई पाटील यांच्या संकल्पनेतून, पिंटू पाटील आणि युवासेना तालुका संघटक तथा युवा पत्रकार गोपाल नाईक यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.काल शिबिर, आज रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्याची कार्यवाही, ही पिंटू पाटील यांच्या कामातील कृतीशीलता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारी आहे. प्रसिद्धीपेक्षा गरजू रुग्णांना दृष्टी मिळावी, या भावनेतून सुरू असलेला हा उपक्रम माहूर तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.

पिंटू पाटील आणि मी मिळून आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरातून गरजू रुग्णांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचे भाग्य आम्हाला मिळत आहे, यापेक्षा मोठे समाधान नाही. काल शिबिर आणि आज प्रत्यक्ष शस्त्रक्रियेसाठी रुग्ण दाखल होत आहेत, हीच आमच्या प्रयत्नांची खरी पावती आहे. नामदार हेमंतभाऊ पाटील व राजश्रीताई पाटील यांच्या प्रेरणेने जनसेवेचा हा प्रवास असाच सुरू ठेवू.

गोपाल नाईक : कार्यक्रमाचे आयोजक तथा युवासेना तालुका संघटक माहुरगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *