माहुर प्रतिनिधी – रुपेश मोरे

माहुर तालुक्यातील मलकागुडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भजन-कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या राष्ट्रोक्ती व विचारसरणीला उजाळा देण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि प्रबोधनात्मक वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी उमरी येथील प्रसिद्ध तबलावादक कोटरंगे गुरुजी, मदनापूर येथील नरवाडे गुरुजी व मंडाळे गुरुजी यांनी आपल्या सुरेल भजन-कीर्तनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या सुमधुर भजन-कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजप्रबोधन, ग्रामविकास, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचे व कार्याचे महत्त्व यावेळी उपस्थितांसमोर पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले.राष्ट्रसंतांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात बंधुभाव, आपुलकी, एकता आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचा मोलाचा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यात आला.
या सोहळ्याला गावातील नागरिक, भजनी मंडळाचे सर्व सदस्य तसेच परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या यशस्वी आयोजनासाठी सुभाष खडसे, नितीन पाटील कन्नलवार, विजय आत्राम, शेषेराव पडलवार, राजू पडलवार, विष्णू पडलवार, आनंदा बोडलवार, नामदेव पोरानंवार, नरसंय्या नुगुरवार, यादव आत्राम, निवृत्ती मोहिते, संजय आत्राम, विशाल पडलवार, किशोर चिंतावर, गजानन कन्नलवार, सुरेश आत्राम, हर्षदीप आत्राम, उत्तम चव्हाण, प्रकाश पडलवार, भारत मडावी, रामप्रसाद बरडे, राहुल गादेवार, विजय चिंतावर, केशव पवार, किसन बरडे आणि दीपक कनाके यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी व भजनी मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रसंतांच्या विचारांची महती सांगणारा हा कार्यक्रम गावकऱ्यांच्या स्मरणात राहणारा ठरला.













Leave a Reply