सत्यशोधक Live न्यूज

माहिती ,सत्य,बातमीदारी

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिक्षण विभागाला सहकार्य करा,दानशुरांनी या संवेदनशील उपक्रमात सहभाग नोंदवावा – व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले यांचे आवाहन.

माहुर प्रतिनिधी :-

श्री रेणुका माता शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती माहूरच्या शिक्षण विभागाने ‘बळीराजा आधार एक हात मदतीचा’ हा अनोखा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांची दिवाळी समाधान कारक व्हावी यासाठी शिक्षण विभागाच्या पुढाकारातून उभारण्यात येत असलेल्या मदत निधीमध्ये खारीचा वाटा उचलून शिक्षण विभागाच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत दानशुरांनी सहभाग घेण्याचे आवाहन व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले यांनी केले आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील माहूर तालुका शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याने महाराष्ट्रासह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे निसर्गाची अनिश्चितता पावसाची कमतरता आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी कुटुंबांना संकटांचा सामना करावा लागत आहे.पुढे उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीत त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि त्यांनाही सन्मानाने दिवाळी साजरी करता यावी या उदात्त भावनेतून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून समाजातील दानशूर व्यक्ती आणि संवेदनशील नागरिकांनीही बळीराजाच्या मदतीसाठी पुढे यावे, असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. श्री रेणुका माता नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत शिक्षण विभागाने समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली आहे. संकटातील शेतकऱ्यांना आधार देऊन त्यांच्या कुटुंबात दिवाळीत आनंद निर्माण करण्याचा हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण ठरत आहे. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, एस. एस. पाटील, काशीनाथ थोटे, संतोष मोहन चव्हाण, बालाजी येरमे, विनोद सुरोशे, आशिष माहुरे एम आर जाधव सुधीर जाधव दिगंबर जगताप संजय मगरे शैलेश पाटील यशवंत वाघमारे अरुण धकाते गोरख जगताप भाग्यवान भवरे कोंडेवाड बुच्चलवार व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष इलियास बावाणी संजय बनसोडे सय्यद किरमाणी राम दातीर आदी उपस्थित होते. बळीराजाच्या कष्टांचा सन्मान करून त्यांची दिवाळी आनंदमय करण्यासाठी माहूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने राबविलेला हा उपक्रम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे यामध्ये सर्वांनी खारीचा वाटा उचलावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *