सत्यशोधक Live न्यूज

माहिती ,सत्य,बातमीदारी

इसापूर धरणातून तातडीने पाणी सोडण्याची आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची मागणी.

धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना

विशेष वृत्त

इसापूर धरणातून उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पिकांना तातडीने पाणी सोडण्यात यावे, यासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी धरण परिसर आणि कालव्यावरील गेटपर्यंत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. सध्या धरणाच्या दुरुस्तीची कामे सुरू असली तरी, शेतकऱ्यांच्या उर्वरित पिकांना (केळी, ऊस, हळद व तूर) संजीवनी मिळावी आणि पिकांचे होणारे नुकसान टळावे, यासाठी तातडीने एक पाणीपाळी सोडण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे पालकमंत्री मा. ना. अतुल सावे साहेब व जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडेही तातडीने पाणी सोडण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी उपलब्ध जलसाठ्याचा योग्य वापर करून उर्वरित पिके वाचवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. पाणी सोडताना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पाहणी प्रसंगी कार्यकारी अभियंता ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प श्री.राजेश देशमुख साहेब,श्री. खेडकर साहेब, कुरुंदकर साहेब आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांसह परिसरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *