जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आढावा बैठक.

माहुर प्रतिनिधी
जगभरात उत्साहात साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी श्री रेणुका देवी मंदिर प्रशासन सज्ज झाले असून रंग रंगोटी सुरक्षा व्यवस्था पिण्याचे पाणी महाप्रसाद यासह भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली असून त्या निमित्ताने नऊ दिवस चालणाऱ्या या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आढावा बैठकासाठी दि 6 रोजी सकाळी 11 वाजता नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली मंदिराच्या प्रांगणात बैठक होणार असल्याने सर्व अधिकारी कर्मचारी व्यापारी पत्रकार बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे शारदिय नवरात्र महोत्सवात लाखोच्या संख्येने भाविक येणार असल्याने गडावर एसटी बसने होणारी प्रवासी वाहतूक तसेच पार्किंग दर्शन रांगा मध्ये भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधा श्री परशुराम मंदिरावर अहोरात्र सुरू राहणारा पंचपकवानांचा महाप्रसाद विद्युत व्यवस्था सुरक्षा व्यवस्था गडावर येणाऱ्या व्हीआयपी वाहनांची पार्किंग शहरातील पार्किंग एसटी बसेस ची वाहतूक नियोजन आरोग्य व्यवस्था ॲम्बुलन्स बंदोबस्त नियोजन तसेच ऐन वेळी गर्दी झाल्यास नियंत्रण अग्निशमन व्यवस्था तसेच गडावर लिफ्ट आणि स्काय वाकचे काम सुरू असल्याने ऐनवेळी होणाऱ्या गर्दीमुळे भाविकांना त्रास होऊ नये यासाठी नियोजन यासह इतर व्यवस्था चोखपणे पार पाडाव्या आणि भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे स्वतः बैठक घेणार असल्याने सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड पोलीस अधिक्षक नांदेड सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किनवट जिल्हा समादेशक होमगार्डस नांदेड उप विभागीय पोलीस अधिकारी माहूर उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा आपतकालीन कक्ष जि.अ.का. नांदेड विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नांदेड यवतमाळ अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरअधिक्षक अभियंता, महावितरण नांदेडकार्यकारी अभियंता महावितरण विभाग भोकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेडजिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेडसहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नांदेड सहाय्यक आयुक्त पुरातत्व विभाग नांदेड गट विकास अधिकारी पंचायत समिती माहूर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन माहूर मुख्याधिकारी नगरपंचायत माहूर व्यवस्थापक, श्री. रेणुकादेवी संस्थान श्री. क्षेत्र माहूरगड, ता. माहूर जि. नांदेड यांनी बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना नांदेडचे अपर जिल्हाधिकारी यांनी काढल्या आहेत.













Leave a Reply