सत्यशोधक Live न्यूज

माहिती ,सत्य,बातमीदारी

तहसीलदार अभिजीत जगताप यांचे उपोषणार्थींना आश्वासन.

माहुर प्रतिनिधी

माहूर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 अ च्या कामांमध्ये अनेक अनियमित्ताचा झाल्या त्यामध्ये प्रमुख्याने डिव्हायडरचे सुशोभीकरण कलरचे पेव्हर ब्लॉक बसविणे पैनगंगा नदीवरील नवीन पूल चालू करणे पथदिवे सुरू करणे यासह इतर मागण्यासाठी गेल्या चार दिवसापासून पत्रकार आपील बेलखोडे राज ठाकूर यांनी उपोषण सुरू केले होते चार दिवसापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांना आश्वासन दिले नसल्याने दि 1 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलन अधिक तीव्र होऊ नये म्हणून स्वतः तहसीलदार अभिजीत जगताप यांनी दखल घेऊन सर्व कामे येत्या नवरात्रोत्सवाच्या बैठकीत निर्णय घेऊन आठ दिवसात सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक अनियमितता होऊनही संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने माहूरकर आणि येणारे भावीक त्रस्त झाले आहेत धनोडा पासून ते टी पॉइंट पर्यंत एकेरी रस्ता बनवण्यात आला शहरात ग्रामीण रुग्णालयापर्यंत डिव्हायडर टाकण्यात आले त्यामुळे उर्वरित रस्त्यावर डिव्हायडर नसल्याने शेकडो अपघात होत आहेत शहरातील अनेक ठिकाणी नाल्या बनविण्यात आल्या व काही ठिकाणी तशाच ठेवण्यात आल्या तर डिव्हायडर मध्ये कुठलेही सुशोभीकरण करण्यात आले नाही गेल्या दोन वर्षापासून पथदिवे लावून खांब उभे असून त्यावरील दिवे सुरू नसल्याने खांब जंगत असून रात्रीला सरपटणारे प्राणी आढळून येतात यासह इतर अनेक समस्या महामार्गावरील जशास तशाच ठेवण्यात आल्याने भाविकांना प्रचंड त्रास होत आहे अनेक वेळा मान्यवरांनी निवेदन देऊनही विकास कामे पूर्ण करण्यात आलेली नसल्याने पत्रकार अपील बेलखोडे राज ठाकूर यांनी उपोषण सुरू केले होते याची कुठलीही दखल राष्ट्रीय महामार्ग विभागाने किंवा इतर संबंधित विभागांनी घेतली नसल्याने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लेखी आश्वासन देऊन प्रलंबित कामे आठ दिवसात सुरू करण्याविषयी नवरात्र उत्सवासाठी आयोजित बैठकीत चर्चा करू असे लेखी पत्र दिल्याने नगराध्यक्ष फिरोज दोसानी आणि शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष लोकनेते जोतिबा दादा खराटे यांचे सह मान्यवरांचे उपस्थित उपोषणास स्थगिती देण्यात आली असून आठ दिवसात कामे सुरू न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यासह उपस्थित मान्यवरांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *