माहुर प्रतिनिधी – रुपेश मोरे
माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळामुळे हेक्टरी रु.१ लाख आर्थिक मदत देणे, घरकुल लाभार्थ्यांची थकीत रक्कम अदा करणे, माहूर नगरपंचायतीतील विविध विकासकामांच्या कथित भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करणे तसेच जनहिताच्या इतर मागण्यासाठी जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे तालुका अध्यक्ष आनंद पाटील तूपदाळे यांच्या नेतृत्वाखाली माहूर तालुका काँग्रेसकडून संतप्त घोषणा देत मोटरसायकल रॅली काढून तहसीलदारांना दि 29 रोजी निवेदन देण्यात आले.

माहूर तालुक्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडले असून, शेतीचा वाढता खर्च, पिकांचे नुकसान आणि उत्पन्नातील घट यामुळे शेतकरी कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, माहूर नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांची थकीत रक्कम, सौरऊर्जा प्रकल्प आणि रस्ते व नाल्यांच्या कामांच्या गुणवत्तेबाबत व आर्थिक व्यवहारांबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भातील आक्षेप व मागण्यांवर घटनात्मक तरतुदींनुसार निष्पक्षपणे विचार करण्यात यावा. यासंदर्भात आंदोलनकर्त्यांची ‘ज्ञानेश हटाव, देश बचाव’ ही मागणी शासनापर्यंत पोहोचविण्यात यावी माहूर तालुक्यासह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या माहूर तालुक्यातील कोरड्या दुष्काळामुळे व पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण व पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी रु.१ लाख आर्थिक मदत देण्याची मागणी शासनाकडे पाठविण्यात यावी. तसेच पीकनुकसान भरपाई, दुष्काळी अनुदान व इतर लागू शासकीय मदतीचे वितरण नियमानुसार तातडीने करण्यात यावे माहूर नगरपंचायतीतील घरकुल प्रकरणाची चौकशी करून थकीत रक्कम द्या माहूर नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल योजनेच्या अंमलबजावणीतील कथित अनियमितता व निधी वितरणासंबंधी तक्रारींची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा इतर जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच पात्र घरकुल लाभार्थ्यांची प्रलंबित व थकीत अनुदानाची रक्कम पडताळणी करून त्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात यावी. शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार संबंधितांकडून वसुली करण्यात यावी नगरपंचायतीमार्फत सन २०१७ पासून आजपर्यंत करण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्प व संबंधित कामांतील मंजूर निधी, निविदा प्रक्रिया, कामांचे आदेश, प्रत्यक्ष कामाची स्थिती, देयके आणि खर्च यांची स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक तपासणी करण्यात यावी. कामात अनियमितता किंवा भ्रष्टाचार झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व इतर जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करून शासनाच्या निधीचे नुकसान झाल्यास नियमानुसार वसुली करण्यात यावी सन २०२४ पासूनच्या रस्ते व नाल्यांच्या कामांची चौकशी करा माहूर नगरपंचायत क्षेत्रात सन २०२४ पासून आजपर्यंत करण्यात आलेल्या रस्ते व नाल्यांच्या बांधकामांची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
संबंधित कामांची अंदाजपत्रके, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया, मोजमाप पुस्तिका, प्रत्यक्ष बांधकामाची गुणवत्ता आणि अदा केलेली देयके यांची तपासणी करण्यात यावी. निकृष्ट दर्जाचे काम, अनियमितता किंवा शासकीय निधीचा गैरवापर आढळल्यास संबंधित कंत्राटदार, अभियंते व इतर जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आवश्यकतेनुसार स्वतंत्र तांत्रिक पथकामार्फत प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात यावी यासह विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार अभिजीत जगताप यांना देण्यात आले यावेळी अनिल पवार नाईक सुभाष जाधव पवन सावळे या तिघांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे यांनी त्यांचा सन्मान केला.
यावेळीभारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे काँग्रेसचे माहूर तालुका अध्यक्ष आनंद गंगाधरराव पाटील तुपदाळे जिल्हा उपाध्यक्ष नागराज सुलगेकर जिल्हा सरचिटणीस अशोकराव बुटले माजी उपनगराध्यक्ष सौ अश्विनी आनंद तूपदाळे पाटील यांचे सह आमीम सय्यद मोबीन शेख अनिल पाटील जाधव अनिल मडपेल्लीवार सादीक शेख मुसा जयकुमार अडकिने शरीफ शेख विठ्ठल प्रेमसिंग राठोड मनोज बाबुलाल जाधव राजू सौंदलकर राजू बोळे माधव मुंडे अब्दुल गफार राजू राठोड कारभारी शेख जावेद शोएबखा नबीखा सय्यद रेहान सलमान खान इमरान खान सावन चव्हाण खाजा खान जायद शेख आदिल शेख शेख तोफिक शाहरुख खान यांचे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









Leave a Reply