सत्यशोधक Live न्यूज

माहिती ,सत्य,बातमीदारी

मायक्रोफायनन्स कंपन्यांच्या अरेरावी विरोधात नांदेडचे माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव यांचे नागरिकांना थेट मदतीचे आवाहन.

माहुर प्रतिनिधी : रुपेश मोरे

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील व तालुक्यातील नागरिक तसेच महिला आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच काही मायक्रोफायनन्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून हप्त्यांच्या वसुलीसाठी महिला व नागरिकांना मानसिक त्रास देणे, धमक्या देणे किंवा बळजबरी व अरेरावी केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर नांदेडचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी तालुक्यातील सर्व मायक्रोफायनन्स गटातील महिला व नागरिकांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दुष्काळसदृश आणि कठीण परिस्थिती असतानाही पैशांच्या वसुलीसाठी फायनन्स कंपन्यांकडून नागरिकांना व महिलांना वेठीस धरले जात आहे.

कोणत्याही मायक्रोफायनन्स कंपनीचा कर्मचारी त्रास देत असल्यास किंवा धमकी दिल्यास न घाबरता थेट संपर्क साधण्याचे आवाहन समाधान जाधव यांनी केले आहे.आपल्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आणि योग्य मदत करण्यासाठी मी आपल्या सोबत आहे,” असा विश्वास त्यांनी यादरम्यान दिला आहे.मायक्रोफायनन्स कंपन्यांच्या वाढत्या मुजोरीमुळे त्रस्त झालेल्या महिला व सर्वसामान्य नागरिकांना या भूमिकेमुळे मोठा धीर मिळाला असून, कर्ज वसुलीच्या नावाखाली होणाऱ्या त्रासाविरुद्ध एक प्रकारे मोठा आधार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *