सत्यशोधक Live न्यूज

माहिती ,सत्य,बातमीदारी

सत्तेचा की समाजाचा लढा? कथित ऑडिओ क्लिपवरून पेटलेल्या वादावर नागरी सेवा अभ्यासक गौरव राठोड यांचा सवाल.

माहूर प्रतिनिधी :

राज्यात एका असत्यापित ऑडिओ क्लिपवरून सुरू झालेले राजकीय वादंग आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पारडी गावचे नागरी सेवा अभ्यासक गौरव संजय राठोड यांनी परखड प्रश्न उपस्थित केले आहेत. कोणत्याही कायदेशीर व फॉरेन्सिक पुराव्याशिवाय उठवलेले हे राजकीय वादळ शेवटी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गौरव राठोड हे प्रशासकीय अभ्यासक असून हिंगोलीचे खासदार नागेश बापूराव पाटील आष्टीकर यांच्या निर्देशांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक गैरव्यवहारांच्या पडताळणीत तांत्रिक विश्लेषण पुरवणारे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

राठोड म्हणाले, “सध्या राज्यभरात शेतकरी दुष्काळ, पीक नुकसानभरपाई आणि आर्थिक मदतीची वाट पाहत आहेत. अशा मोक्याच्या वेळी कोणत्याही फॉरेन्सिक तपासणीशिवाय एका कथित क्लिपच्या आधारे आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून प्रशासनाचे लक्ष मूळ समस्यांवरून विचलित केले जात आहे. ही आंदोलनाची दिशा नसून बळीराजाच्या हिताशी झालेली प्रतारणा वाटते.”

“सामाजिक बांधिलकीतून उभ्या राहिलेल्या आंदोलनात आता कोट्यवधींच्या वाहनांचे ताफे, अवाढव्य खर्च आणि राजकीय महत्त्वाकांक्षा उघड दिसू लागल्या आहेत. केवळ एका अज्ञात क्लिपच्या आधारे सरकारवर दबाव आणून निवडणुकीच्या जागा अथवा व्यक्तिगत राजकीय स्थान पक्के करण्याचा हा डाव आहे का?” असा थेट सवाल त्यांनी विचारला. स्थानिक प्रशासनाप्रमाणेच अशा मोठ्या आंदोलनांनीही आपल्या आर्थिक व राजकीय उद्दिष्टांबाबत जनतेशी प्रामाणिक राहावे, असे आवाहन त्यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *