सत्यशोधक Live न्यूज

माहिती ,सत्य,बातमीदारी

सिंदखेड परिसरात जिओ मोबाईल टॉवर उभारण्याची पिंटू पाटील यांची मागणी.

हेमंत पाटील यांनी दिले जिओ प्रशासनाला पत्र.

माहुर/विशेष प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील सिंदखेड व आसपासच्या परिसरातील अपुऱ्या मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर मात करण्यासाठी येथे जिओ मोबाईल टॉवर उभारण्यात यावा, अशी मागणी पिंटू पाटील वायफनीकर यांनी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) तथा विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांच्याकडे केली त्यानंतर कुठलाही वेळ न लावता हेमंत पाटील यांनी यासंदर्भात जिओ इन्फ्रास्ट्रक्चर विभाग, नांदेडच्या व्यवस्थापकांना ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत पत्र पाठवले आहे.सिंदखेड परिसरातील वसराम नाईक तांडा, सतीगुडा, बामणगुडा, वायफनी, मनीरामखेड, लोकरवाडी, करंजी, सेलू व डुंद्रा आदी गावांमध्ये सध्या मोबाईल नेटवर्कची सुविधा अत्यंत अपुरी आहे. यामुळे विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजात व आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.सुरक्षिततेसाठी नेटवर्क आवश्यक:सिंदखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पोलीस स्टेशन कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यविषयक व सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात उत्तम आणि अखंडित मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे.या सर्व बाबींचा विचार करून जिओ कंपनीने संबंधित विभागाशी समन्वय साधून सिंदखेड येथे तातडीने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी पाठपुरावा करावा आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी हेमंत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *