
माहुर प्रतिनिधी
माहूर तालुक्यातील वानोळा बाजार येथील 100 के व्ही कृषी डी पि दि. 22 रोजी अचानक डीपीतील अंतर्गत वायरिंग जळाल्याने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज बंद पडली होती. या घटनेचा अहवाल माहूर उपविभागाच्या सहाय्यक अभियंता यांनी उपविभागाकडे तातडीने सादर केला होता परंतु यावर्षी पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता दिसु लागली तरीही महावितरण कडून डीपी देण्या संधर्भात शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली शेतकऱ्यांनी ही अडचण शिवसेना शिंदे गट जिल्हा सहसंपर्क प्रमुख रवि राठोड यांच्याकडे मांडली रवि राठोड यांनी ही माहिती मा. ना. हेमंत भाऊ पाटील यांना दिली हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व रवि राठोड यांच्या सततच्या महावितरण च्या भोकर व नांदेड वरिष्ठ अधिकाऱ्यांन कडे पाठपुरावा करून अवघ्या दोन दिवसात नवीन 100 के व्ही क्षमतेची कृषी डी पि मंजूर करून बसवण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाल्याने शेतकऱ्यातून रवी राठोड यांचे अभिनंदन होत आहे.

वानोळा पंचक्रोशीत नागरिकांना मोबाईल नेटवर्कचा गंभीर प्रश्न होता. यासाठी रवि राठोड यांनी दि. 3 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिले होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे दखल घेतल्याने आता वानोळा येथे मोबाईल टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच 5 जी सेवा सुरू होणार आहे. काही दिवसातच दुसरा प्रश्न म्हणून कृषी डी पि चा प्रश्न देखील शिवसेनेच्या प्रयत्नाने सोडवला गेला आहे.यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी वानोळा येथील सुरेश राठोड संजय चव्हाण ईश्वर चव्हाण किशोर पाटील प्रवीण चव्हाण अजय चव्हाण रोशन चव्हाण राम चव्हाण अविनाश चव्हाण यांचेसह उपस्थित शेतकऱ्यांनी मा ना हेमंत भाऊ पाटील यांचे सह रविभाऊ राठोड यांचे आभार मानले असून शेतकरी नागरिकांना कुठलीही अडचण आल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन शिवसेना शिंदे गट नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख रवी भाऊ राठोड यांनी केले आहे.









Leave a Reply