
ढाणकी (यवतमाळ) प्रतिनिधी
उमरखेड पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी ढाणकी परिसरात एका जुगार अड्ड्यावर छापा मारून १४ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, दुचाकी वाहने, मोबाईल आणि इतर साहित्यासह एकूण १८ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी गौरव कायदे-पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक गणेश मुंढे आणि त्यांच्या टीमने बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर छापा टाकला. घटनास्थळावरून २ लाख २७ हजार रुपये रोख, १३ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या २२ दुचाकी, २ लाख २४ हजार ५०० रुपयांचे १६ मोबाईल, १३ हजार रुपयांचे २ कुलर आणि पत्त्यांचे ३० पॅकेट जप्त करण्यात आले आहेत.

पकडण्यात आलेल्या लोकांमध्ये ढाणकी, चालगणी, निगणी, उमरखेड, फुलसावंगी, हदगाव आणि नांदेड येथील रहिवाशांचा समावेश आहे. शेख बबलू शेख मन्नान,शेख अहमद शेख मिराज,कुंडलिक किसनराव धोंडे,अमोल किसन भुरे,नामदेव दत्ता शिरगिरे,सचिन सुभाष जाधव,शेख संदल शेख कासम,राजू केरबा कांबळे,तुकाराम देवराव जाधव,शेख सादिक शेख अहमद,शेख मतीन शेख हमीद,शेख फारुख शेख,भानुदास पांडुरंग वानखेडे,शेताचे मालक गजानन शिवाजी चंद्रे यांचा समावेश आहे. कारवाईत सहभागी पोलिस पथक:या कारवाईत पोलिस कर्मचारी अनिल पवार, प्रमोद टिमके, सुनील कालुसे, परमेश्वर मुंढे, दादाराव मिरासे, इंदल आडे, चेतन आडे, गोविंद जायभाये, गोविंद कवटीकवार, गणेश पंघरवाडे, मारोती धुलगंडे, सौरभ जामकर, श्रावण मोकाडे आणि वैभव धाडवे यांनी सहभाग घेतला.







Leave a Reply