वाई बाजार येथे सिंदखेड पोलिसांचे पथसंचलन

गणपती विसर्जनाचा सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सिंदखेड पोलिसांच्या वतीने वाई बाजार येथे रुट मार्च काढण्यात आला.

सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे याच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पोलीस अधिकारी आणि होमगार्ड दलाचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वाई बाजारातील मुख्य रस्ते आणि संवेदनशील भागांतून पोलिसांनी शिस्तबद्ध संचलन करत नागरिकांना सुरक्षेचा विश्वास दिला. गणेश विसर्जन सोहळ्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

“सर्व गणेशभक्तांनी आणि मंडळांनी नियमांचे पालन करून विसर्जन सोहळा उत्साहात व शांततेत साजरा करावा असे आवाहन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांनी गणेश मंडळांना केले.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *